महावितरण रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिमंडळ उत्कृष्ट यंत्रचालक पुरस्काराने महेश सुर्वे यांचा गौरव
चिपळूण तालुक्यातील पोसरे गावचे सुपुत्र महावितरण कंपनीतील खेड विभागांतर्गत ३३/११ के.व्ही. उपकेंद्र फणसू, उपविभागीय दापोली २ चे वरिष्ठ यंत्रचालक महेश मारूती सुर्वे यांनी नुकतेच महावितरणच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिमंडळातील उत्कृष्ट यंत्रचालक पुरस्काराने महाराष्ट्र दिनी गौरविण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महावितरणच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिमंडळातील कर्मचार्यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १७ तंत्रज्ञ, ३ यंत्रचालक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० तंत्रज्ञ आणि २ यंत्र चालकांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार मिळाले आहेत.www.konkantoday.com