
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कागलच्या सायली फासके राज्यात प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात उंदरवाडी (ता. कागल) येथील सायली साताप्पा फासके या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या. एमपीएससीच्या वतीने कृषी सेवा २०० जागांसाठी जाहिरात करण्यात आली. सायली फासके (Sayali Phasake) यांचे वडील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहे. उंदरवाडीतील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये त्यांचे शालेय शिक्षण व प.बा. पाटील हायस्कूल मुदाळतिठ्ठा येथे हायस्कूलचे शिक्षण झाले. बारावीचे कोल्हापुरात शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले व त्या सध्या राहुरीमध्ये त्या एमएस्सी करीत आहेत. २०२० पासून त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात कृषी सेवा परीक्षेत यश मिळाले आहे.