कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एलटीटी ते थिविम या मार्गावर अनारक्षित गाडी धावणार
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एलटीटी ते थिविम या मार्गावर अनारक्षित गाडी धावणार आहे.ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाणार आहे. सध्या या मार्गावरील रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अनेक प्रवाशी प्रतीक्षा यादीवरील तिकिटावर प्रवास करीत आहेत.त्यामुळे रेल्वेने काही गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम आणि लोकमान्य टिळक (एवटीटी) ही गाडी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अनारक्षित धावणार आहे. गाडी क्र. ०११२९ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम (साप्ताहिक) अनारक्षित विशेष गाडी आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी १३ मे ते ५ जून पर्यंत धावणार आहे. परतीसाठी गाडी क्र. ०११३० थिविम ते लोकमान्य टिळक (एलटीटी) अनारक्षित विशेष गाडी आता मंगळवार, गुरुवार आणि रविवारी १४ मे ते ६ जूनपर्यंत धावणार आहे.www.konkantoday.com