कोकणात गावाला येण्यासाठी निघालेल्या तरुणाचा कोकणकन्या एक्सप्रेस मधील उसळलेल्या गर्दीने घेतला बळी

* मे महिन्यात कोकणातील चाकरमानी गावाला येण्यासाठी धडपडत असतात सध्या कोकण रेल्वेची सर्व तिकिटे फुल झाल्याने जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी चाकरमनी धडपडत असतात त्यामुळे जनरल डब्यात गर्दी उसळत असते अशीच दुर्दैवी घटना मुंबईत दादर स्टेशन वर घडली आहे कोकण कन्या एक्सप्रेस मधून जनरल डब्यात दारात असलेल्या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील लोकप्रतिनिधींनी आपण किती चांगले काम केले याचा गौरव करून आपली पाठ थोपटून घेतले परंतु मे महिना गणपती व शिमगा आधी कोकणी माणसाच्या सणाला कोकण रेल्वेच्या ज्यादा गाड्या व सुविधा उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरलेले आहेत हे मुंबईतील घटनेवरून लक्षात येते कोकणकन्या एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून पडून एका तरुणांच्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दादर रेल्वे स्थानकांवर घडली आहे.अमित पवार असे मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे.या घटनेनंतर कोकणातील रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत मुंबई शहरातून कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी केलेली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अमित पवार हे कांदिवलीतील चारकोप परिसरात वास्तव्यास होते. कोकणातील गावी जाण्यासाठी गुरुवारी त्यांनी कोकणकन्या एक्स्प्रेसचा पर्याय निवडला. एक्स्प्रेसचे आरक्षण पूर्ण झाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोकणकन्या प्लँटफॉर्म क्रमांक ११ वर येताच. अमित पवार यांनी जनरल डब्याकडे धाव घेतली. परंतु, जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याने त्यांना डब्यात प्रवेश करायला मिळाला नाही. त्यामुळे अमितने जनरल डब्याच्या दरवाज्यावरील पायदानावर लटकत त्यांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. दादर स्थानकातील फलाटावरून गाडी सुटली. गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला आणि फलाटाच्या टोकावर पडले आणि गाडीच्या चाकाखाली सापडले. या अपघात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,अनेकदा प्रवासी संघटनेने रेल्वे गाड्यांच्या गर्दी संदर्भात गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्रवाशांनीही जीवावर उदार होऊन प्रवास करू नयेत. गाडीत खरंच जीवघेणी गर्दी असेल तर इतर पर्यायी रेल्वे किंवा बसचा वापर करावा असे आवाहन कोकण विकास समितीने प्रवाशांना केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button