
उष्णतेची लाट अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॉटने वाढली
राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॉटने वाढली आहे.उकाड्याने हैराण झालेल्या जनतेने दिवसरात्र पंखे व कुलर सुरू ठेवल्याने हा भार महावितरणवर पडला आहे. मे महिन्यात विजेची मागणी २४ हजार ८६० मेगावाॅटवर गेली आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com