
विदेशात बंदी घातल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बडे मसाला उत्पादक तपासणीच्या फेर्यात
भारतीय मसाल्यांना हॉंगकॉंग व सिंगापूर या देशांनी बंदी घातल्यानंतर भारतीय खाद्यवर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व ठिकाणच्या मसाला उत्पादकांकडचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठवण्याचे व्यापक अभियान हाती घेण्यात आले. जिल्ह्यातील ३ मातब्बर उद्योजकांकडील मसाला उत्पादनांचे नमुने सिलबंद करून ते तपासणीला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.अलिकडेच अमेरिकेने भारतीय मसाल्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. भारतातून पाठवलेल्या मसाल्यांपैकी एक तृतीयांश मसाला साठा खाण्यास अयोग्य म्हणून माघारी पाठवला. अमेरिकेने आपल्या मसाल्यांना त्यांच्या देशात उतरण्यासाठी जागा दिली नाही. भारतीय मसाले घेवून गेलेल्या जवळपास ११ नौकांना अमेरिकेने प्रवेश नाकारला. या मसाल्यांमध्ये साल्मोनेला या जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला. या आधी सिंगापूर व हॉंगकॉंग येथून भारतीय मसाले परत पाठवले गेले. कर्करोगास आमंत्रण देणारे घातक रसायन त्यात आढळले. साल्मोनेला हा जीवाणू अस्वच्छतेतून पुढे येतो. अमेरिकन निरिक्षकांनी भारतीय मसाला कारखाने पाहिल्यानंतर या जीवाणूचा संबंध मसाल्यांशी कसा आला असावा, याचे कोडे लगेच उलगडले. अमेरिकन निरीक्षकांच्या मते भारतीय मसाला उद्योग पुरेशी स्वच्छता राखत नाही. हॉंगकॉंग व सिंगापूर यांनी घातलेली मसालाबंदी गंभीर स्वरूपाची आहे. www.konkantoday.com