
संगमेश्वर बस स्थानकात स्थानिकांसाठी गाळे उपलब्ध करण्याची मागणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेले संगमेश्वर बसस्थानक नुतन इमारतीसाठी ३ कोटी ५ लाख रुपये मंजूर झाले असुन या कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. नव्याने सुरू होत असलेल्या संगमेश्वर बस स्थानकामध्ये दुकानदारांना गाळे मिळावेत, अशी मागणी होत आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये स्थानिक दुकानदारांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.संगमेश्वर बसस्थानकाची नूतन इमारत सद्यस्थितीमध्ये दोन मजली असणार असून तळमजल्यावर कॅन्टीन आरक्षण आणि पास कक्ष, पोलीस चौकी, हिरकणी कक्ष तसेच बैठक व्यवस्थेबरोबरच पुरूष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.www.konkantoday.com