राष्ट्रीयकृत बँकांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेतून गतवर्षी पेक्षा चौपटीहून अधिक कर्जाचे वितरण केले
चालू वर्ष हे निवडणूक वर्ष म्हणून पार पडत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार योजना कार्यक्रमासाठी ९२९ उद्योजकांना ४६.८० कोटी रुपयांचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकांनी वितरित केले. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल चौपटीहून अधिक कर्ज वितरण झाले आहे.राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्णरितीने आत्मनिर्भर बनण्याकरिता त्यांचे स्वरंरोजगार प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक तरतुदी करून बँकांच्या सहकार्याने मुख्यमंत्री रोजगार योजना तयार करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षात १ लाख सुक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून १० लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध करण्यासाठी २०१९-२० पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. नोकरी शोधणारे तरूण, छोटे व्यावसायिक आणि उद्योजक यांना या योजनेतून कर्ज देण्यात येणार आहे. www.konkantoday.com