रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये आता अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये आता अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.हा उपयुक्त पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने (Ratnagiri Municipality) केला आहे. पाणीटंचाई आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने पालिकेचे नियोजन सुरू आहे.रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत. शीळ, पानवल धरण (Panvel Dam) आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवले आहे, तर नाचणेतील तलाव आटल्यामुळे एका शीळ धरणावर शहराची भिस्त आहे. गेल्या वर्षी या महिन्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू होता. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७७६ दशलक्ष घनमीटर आहे; परंतु या वेळी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीपासूनच धरणातील साठा मर्यादित झाला. सध्या या धरणामध्ये ०.८१९ दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे. धरणात २५ टक्केच पाणी आहे. हे पाणी १५ जूनपर्यंत पुरेल, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button