
रत्नागिरी शहराजवळील भाटे दर्गा स्टॉप येथील प्रवासी शेडचा काही भाग कोसळला, दोन जण किरकोळ जखमी
सध्या राज्यातील एसटी विभागांच्या गाड्यांची दुरावस्था झाली असतानाच आता प्रवाशांसाठी उभारलेल्या प्रवासी शेडची देखील दुरावस्था झाली आहे आज संध्याकाळी रत्नागिरी शहरा जवळील भाटे दर्गा स्टॉप येथे प्रवासी शेडचा काही भाग कोसळल्याने रत्नागिरी शहरातील उद्यम नगर येथील आनंद पेडणेकर व त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला आहेपेडणेकर हे आपल्या मुलासह स्कूटरने जात असताना स्कूटर पंक्चर झाल्याने ते निवारा शेड जवळ थांबले असताना अचानक या प्रवासी शेडच्या स्लॅबचा काही भाग कोसळला त्यामुळे त्याना व त्यांच्या मुलाला पायाला मार लागला आहे या धोकादायक शेडचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहेwww.konkantoday.com