रत्नागिरी जिल्ह्यात जनधन खात्यात वर्षभरात २४ हजारांनी वाढ
प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात गत आर्थिक वर्षाच्या अखेर ४ लाख ३ हजार खाती होतील. यावर्षी त्याची संख्या ४ लाख २७ हजारावर पोहोचली आहे. वर्षभरात या प्रकारच्या खात्यांमध्ये २४ हजार खात्यांची भर पडली आहे.त्या संदर्भातील आकडेवारी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, ३१ मार्च २०२३ अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक बँकांमध्ये ४ लाख २ हजार ९९३ एवढी खाती जनधन योजनेत नोंदवण्यात आली. ३१ मार्च २०२४ अखेर त्यात भर पडली आणि त्यांची संख्या ४ लाख २७ हजार ५०५ वर जावून पोहोचली.www.konkantoday.com