मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपुरे, पावसाळा येऊन ठेपल्याने दरडीचा धोका कायम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास गेल्याने या घाटातील वाहनांचा प्रवास वेगवान झाला आहे. मात्र अजूनही घाटातील दरडप्रवण क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. पावसाळा जवळ येवून ठेपला तरीही उपाययोजना न केल्याने यावर्षी पावसाळ्यात दरडींचा त्रास कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.पेढे-परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम शहरातील उड्डाणपूल वगळता बहुतांशी पूर्णत्वास गेले आहे. मात्र या टप्प्याच्या प्रारंभीच असलेल्या परशुराम घाटाच्या कल्याण टोलवेज या कंत्राटदार कंपनीकडून सुरू असलेल्या कामाची गती ही काहीशी मंदावलेली आहे.www.konkantoday.com