परशुराम घाट सर्व्हिसरोडचे काम निकृष्ट झाल्याची सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांची तक्रार

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला असणार्‍या सर्व्हिस रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी केला आहे. जुन्याच मुंबई-गोवा महामार्गावर डांबरीकरण केले असून गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी जुन्या रस्त्यावर केलेले डांबरीकरण अक्षरशः हाताने निघत आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिले असता निकृष्ट दर्जाचा सर्व्हिस रोड झाल्याचा आरोप केला गेला आहे. या रस्त्याची सद्य परिस्थिती पाहता पूर्ण रस्त्यावर माती पसरली असून अनेक ठिकाणी दोन महिन्यापूर्वी बनविलेला रस्ता उघडल्याचे देखील पहायला मिळत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button