
नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण, पुणे सत्र न्यायालयात आज सुनावणी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर. यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आज महत्त्वाचा दिवस आहे.या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयालयात आज निकाल सुनावण्यात येणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. या हत्येनंतर, 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू हा खटला सुरु झाला होता. त्यानुसार, आज शुक्रवार 10 मे रोजी निकाल आहे. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल होत त्याच्यावर खटला सुरु होता. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.