अक्षयतृतीच्या मूहूर्तावर कोकणातून 70 ते 80 हजार हापूस आंबा पेटय़ा नवी मुंबईच्या मार्केटला
आंबा हंगामामध्ये नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये अक्षय्य तृतीयेला आंबा आवकचा विक्रम होत असतो. अक्षय्य तृतीयेमुळे तेथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची मोठी आवक वाढली आहे. बुधवारी 1 लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली होती. त्यामध्ये कोकणातून 47 हजार व इतर राज्यांतून 53 हजार पेटय़ांची आवक झाली. अक्षयतृतीयाया मूहूर्तावर कोकणातून 70 ते 80 हजार हापूस आंबा पेटय़ा नवी मुंबईच्या मार्केटला जातील, असा अंदाज येथील आंबा बागायतदारांतून वर्तवला गेला आहे.अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी 1 लाख हापूस आंब्याची पेटी बाजार समितीत आवक झाली होती. त्यामध्ये कोकणातून 47 हजार तसेच इतर महाराष्ट्रतून 53 हजार पेटय़ांची आवक झाली होतीwww.konkantoday.com