पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली बैठक
रत्नागिरी, दि. १० – पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होत असल्याने, त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेवून सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल घेवून ते उद्यापर्यंत पाठवावेत. एमसीएमसी, एमसीसी समिती स्थापन करा. प्रत्येक विधानसाभा मतदार संघात एक भरारी पथक कार्यरत ठेवावे, अशा सूचना श्री. सिंह यांनी दिल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.www.konkantoday.com