संगमेश्‍वर तालुक्यातील चोरवणे येथे स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर मोबाईलची रींग वाजली

देशात सर्वदूर मोबाईल नेटवर्कचे जाळे पसरलेले असताना संगमेश्‍वर तालुक्यातील चोरवणे येथे स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही मोबाईल नेटवर्कचा थांगपत्ता नव्हता. यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. अखेर ग्रामस्थांच्या पुढाकारातून टॉवर उभारण्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी टॉवरची उभारणी करत सेवाही कार्यान्वित केली आहे. यामुळे तब्बल ७६ वर्षानंतर गावात अखेर मोबाईलची धून वाजू लागली आहे. चोरवणेत मोबाईल नेटवर्कसाठी गावातील तरूण, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींसह शासनदरबारी पाठपुरावा करून देखील पदरी निराशा पडली होती. मोबाईल नेटवर्कअभावी शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याशिवाय चोरवणे येथे माथ्यावर स्वयंभू श्री नागेश्‍वर देवस्थान असून महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक याठिकाणी येत असतात. याशिवाय मात्र मोबाईल नेटवर्कअभावी पर्यटकांची कोंडी होत होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button