संगमेश्‍वरात रूग्णवाहिका चालकांचे उद्यापासून कामबंद आंदोलन, रूग्णांची गैरसोय होण्याची शक्यता

संगमेश्‍वर तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेवर असलेल्या चालकांचे वेतन न झाल्याने चालकांनी १० मे पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन चालकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केले.जनतेला आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाबरोबरच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहेत. संगमेश्‍वर तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून यामध्ये साखरपा, धामापूर, निवे, सायले, बुरंबी, कडवई, फुणगूस, माखजन, कोंडउमरे, वांद्री, देवळे यांचा समावेश आहे. या केंद्रांना रूग्णवाहिकाही देण्यात आली आहे. अधिकारी कर्मचार्‍यांना अन्य ठिकाणी सेवेसाठी जाताना, रूग्णांना ने-आण करणे, साहित्य आणणे आदी कामांसाठी या रूग्णवाहिकेचा उपयोग होतो. ही रूग्णवाहिका अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. ११ रूग्णवाहिकांवर ११ चालक कार्यरत आहेत. वाहनचालकांचा ठेका १३ मार्च २०२४ पासून पुणे येथील एका कंपनीला देण्यात आला आहे. आजतागायत कंपनीकडून वाहनचालकांना वेतन अदा करण्यात आलेले नाही. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button