
शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामातच मग्न, सरकारी कार्यालयात कर्मचार्यांची संख्या रोडावली
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीमुळे शासकीय कार्यालयाचा कारभार विस्कळीत झाला असतानाच बुधवारी सुट्टी नसतानाही कर्मचार्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली. येथील प्रांत कार्यालयाचा तर चक्क कुलूप होते. तर तहसीलदार कार्यालयाची मदार एका अधिकार्यावर होती. पंचायत समिती, नगर परिषदेत ५० टक्के कर्मचारी दिसून येत होते. हा सारा मतदान प्रक्रियेला झालेला उशिराच्या प्रक्रियेचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या कामेच होत नसल्याने नागरिक नाराज आहेत.लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी या कामात गुंतले आहेत. त्यामुळे काहींना या कामातून डोकेवर काढण्यासाठीही वेळ मिळाला नाही. त्यामुळे ते कार्यालयात न येता मुख्य ठिकाणी निवडणुकीचे काम करताना दिसत होते. www.konkantoday.com