राज्यात आजपासून म्हणजे 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
सध्या अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, राज्यात आजपासून म्हणजे 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी दिली आहे.राज्यात मध्य महाराष्ट्र विभागात तीव्र तापमान वाढीमुळं हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार वळिव पाऊस तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील काही भागात 9 मे ते 15 मे या काळात पाऊस होईल. तसेच मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणीसह संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात देखील याच काळात वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेउत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये 9 मे रोजी पावसाची शक्यता आगे. तसेच संभाजीनगर आणि अहमदनगर भागात देखील पुढील दोन तीन दिवस गडगडाटी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात कसे असेल हवामान?कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होणार असल्याची माहिती विजय जायभावे यांनी दिली आहे. www.konkantoday.com