फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कडून उद्योजकीय पुरस्काराची घोषणा जीवन गौरव ,स्टार्टअप, विशेष उद्योजकीय पुरस्काराचा समावेश

रत्नागिरी — रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी केलेल्या श्रमाचा, उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे, त्याचे अभिनंदन करणे, जिल्ह्याची अधिकाधिक औद्योगिक प्रगती व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्टार्ट पुरस्कार, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, सामाजिक जबाबदारी पुरस्कार,जागतिक उद्योजक पुरस्कार आणि विशेष उद्योजकीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.गतवर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री राजू सावंत यांनी दिली. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार ( Ratnagiri District Entwrprenuership Award)रत्नागिरी जिल्ह्यात कमीत कमी पाच वर्षे यशस्वीपणे औद्योगिक उत्पादन करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या उद्योजकास हा पुरस्कार देण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार — सामाजिक जबाबदारी(Corporate Social Responsibility Award)सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सीएसआर फंड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करून समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी उद्योजक किंवा औद्योगिक समूहाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार देण्यात येईल. जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक ज्याने २५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग केला आहे,नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून उद्योग यशस्वी केला आहे व सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे अशा उद्योजकास जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल.सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार (बेस्ट Start-up Award)सर्वोत्कृष्ट स्टार्ट पुरस्कार हा अपवादात्मक नव कल्पना,वाढीची क्षमता, उद्योजक वृत्ती,नाविन्यपूर्ण मानके स्थापित करतो, सकारात्मक बदल घडवितो, रत्नागिरी जिल्हा प्रभावित करतो अशा स्टार्टअप ला दिला जाणार आहे.जागतिक उद्योजक पुरस्कार(Global Enterprenure of The Year)वर्षातील जागतिक उद्योजक हा पुरस्कार ज्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून केली आहे आणि राज्य,देश आणि जागतिक पातळीवर यश मिळवले आहे अश्या उद्योजकाला/ औद्योगिक समूहाला देण्यात येईल. विशेष उद्योजकीय पुरस्कार( Special Enterprenureship Award)एखाद्या होतकरू उद्योजकाने आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेने उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उद्योग व्यापार किंवा शेती या कोणत्याही क्षेत्रात आपले योगदान देऊन आपला ठसा उठवला आहे,कुशल – अकुशल स्थानिक कामगारांना,बचत गटांना रोजगार व बाजारपेठ मिळवून दिली आहे अशा उद्योजकाला किंवा उद्योग समूहाला हा पुरस्कार देण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष श्री राजू सावंत यांनी दिली. पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी स्वतः उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे अपेक्षी अपेक्षित आहे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी ३१ मे २०२४ पूर्वी आपले अर्ज https://frdcci.org.in/award-form/ या लिंक वर किंवा फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, द्वारा गणेश मेटल वर्क्स, डी 19, मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी ४१६६३९ या पत्त्यावर पाठवावे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button