पावशा पक्षाची शीळ रानावनात घुमू लागली
पेरते व्हा, पेरते व्हा अशी पावशा पक्षाची शीळ रानावनात घुमायला लागली असून शेतकर्यांच्या डोळ्यात हिरवे स्वप्न तरळू लागले. पासाचा शुभसंकेत देणारा पावशा पक्षी सध्या जिल्ह्यातील विविध भागात दिसत आहे. शेतशिवारात आता कामांची लगबग वाढली असून नांगरणी, पर्हे टाकणे, धुरे पेटविण्याच्या कामांना वेग आला आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकर्यांना पेरते व्हा, असा संदेश पावशा पक्षी देतो, सध्या शेतशिवारात या पक्षाची साद घुमत आहे. त्यामुळे लवकरच पाऊस कोसळेल अशी आस शेतकर्यांना आहे. शेतशिवारात सध्या खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी नांगरणी करीत आहेत. काही शेतात पर्हे टाकण्याचे काम करीत आहेत. धुरे पेटवून दिले जात आहेत. कामांची लगबग सुरू आहे. पाऊस वेळैवर आला तर आपली पंचाईत नको म्हणून प्रत्येक शेतकरी मशागत करण्यात व्यस्त झाला आहे. अशातच पावशा पक्षाने शुभसंकेत दिले आहेत. www.konkantoday.com