निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना खेड तालुक्यातील पोलीस काँस्टेबलचा मृत्यू
मुंबई येथील शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेल्या व खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडीचे विलास यादव हे निवडणुकीच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना त्यांचा अकस्मित मृत्यू झाला आहे त्यामुळे खेड तालुक्यातील वरवली गावावर शोककळा पसरली आहे. विलास यादव हे शिवाजी पार्क पोलीस ठाणे या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर होते. निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या पोलिसांच्या फ्लाईंग स्कॉड म्हणजेच भरारी पथकामध्ये कर्तव्यावर होते सकाळी सात वाजता अंटोनिया डी. सिल्वा हायस्कूल येथील स्ट्रॉंग रूम येथे ते हजर झाले व भरारी पथकाच्या अधिकारी कर्मचारी व यांच्यासोबत जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे एफएसटी वन स्कॉड पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी विलास यादव यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या मोबाईल वन गाडीने सुश्रुषा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले, मात्र उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे तपासणी करून यांना मृत घोषित केले.www.konkantoday.com