
खेड येथील मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
एका मुलीचा पाठलाग करून त्रास देत लग्नासाठी वारंवार विचारणा करत लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका असलेल्या संदेश पाष्टे या संशयिताची न्यायालयाने एक महिन्यातच निर्दोष मुक्तता केली.पीडित मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत खेड येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्यास अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा जलदगतीने खटला चालवण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. संशयिताच्यावतीने ऍड. स्वरूप सुबोध वरवळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. www.konkantoday.com