खेड तालुक्यातील वेरळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
खेड तालुक्यातील वेरळ परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुत्र्यांचा वावर दिवसागणिक वाढतच असल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोक्याच्या ठिकाणी कुत्र्यांच्या दहशतीमुळे खेळण्यासाठी जाणार्या लहान मुलांच्यात भीतीचे वातावरण आहे.मोकाट जनावरांपाठोपाठ कुत्र्यांचा वावर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. कोणत्याही क्षणी कुत्र्यांच्या झुंडी भर रस्त्यात दाखल होत असल्याने सार्यांचीच त्रेधातिरपीट उडत आहे. विशेषतः वाहनचालकांची फसगत होत असून अपघातदेखील घडत आहेत. www.konkantoday.com