ऐन निवडणुकीत आली शिंदे सरकारची झोप उडविणारी बातमी
‘टेंडरनामा’ने सर्वात आधी उजेडात आणलेले तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे ॲम्ब्युलन्स घोटाळा प्रकरण राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत मंजूर केलेल्या या टेंडरमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत पुण्यातील विकास लवांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची न्यायालयाने दखल घेतली असून, या प्रकरणी राज्य सरकारने खुलासा करावा, असा आदेश दिला आहे.एकूणच ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात सरकारचा पाय आणखी खोलात गेल्याचे मानले जात आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे राज्य सरकार बरोबरच हे टेंडर मिळालेल्या ‘सुमित’ आणि ‘बीव्हीजी’ या कंपन्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.www.konkantoday.com