७ वर्षीय शिवतेज रामचंद्र वांगेकर या बहाद्दराने ‘किंग ऑफ कुंभार्ली’ किताब पटकावला.सायकलवरून कुंभार्ली घाट केला पार!
चिपळूण नजिक नुकतीच कुंभार्लीचा राजा सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शिवतेज रामचंद्र वांगेकर या बहाद्दराने ‘किंग ऑफ कुंभार्ली’ किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये सहभागी होत चिपळूण कुंभार्ली घाट पार करणाऱ्यांमध्ये राजुद्दीन मोमीन (वय ५२), या विकास सुतार, विकास तेनर्गीकाई, रामचंद्र वांगणेकर, प्रेयश काळे, रोनक माने, हर्षवर्धन कोरडे, ईशान पवार, शिवतेज वांगणेकर यांचा समावेश आहे. विटा सायकलिंग क्लबचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. ७ वर्षाच्या बालकाने किंग ऑफ कुंभार्ली किताब मिळवल्याबद्दल शिवतेज याचा सत्कार विटा सायकलिंग क्लबच्या वतीने करण्यात आला.www.konkantoday.com