१० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार

* ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये दोन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी या चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० मे रोजी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १३ जून रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button