
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे गावातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्याला मारहाण
लोकसभा निवडणुकीत मतदानानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते,माजी उपसरपंच बाळा राऊत यांना मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते बाळा राऊत हे शेर्पे येथे दुकानात बसले असता अचानक ६.२० च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते आले. त्यानंतर त्यांनी काही समजण्याच्या आत ‘मला लाथा बुक्यानी व दांडयांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली’ असल्याचे जखमी बाळा राऊत यांनी सांगितले. भाजप पक्षाचे कार्यकर्ते बाळा जठार, दिलीप तळेकर, नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.www.konkantoday.com