शॉर्टसर्किटमुळे बैल बागेतील घराला आग एक लाखाचे नुकसान
* रत्नागिरीशहरातील बेलबाग येथील भाजीविक्रेत्याच्या भाड्याने घेतलेल्या घराला रविवारीरात्री आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमध्ये संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. त्यामध्ये भाजी दलालाला देण्यासाठी ठेवलेले सुमारे १ लाख रुपये रोख आणि टीव्ही, फ्रीजसह सर्व वस्तू जळून गेल्या.नुकसान झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव झोरे असे आहे. या आगीची झळ शेजारच्या घरालाही बसली. त्या घरात झोरे यांचे भाऊच राहतात. बेलबागेत एका इमारतीच्या तळमजल्यावरील दोन खोल्यांमध्ये भाजीविक्रेते झोरे भाड्याने राहत होते. ते दोघे रविवारी व्यवसायासाठी घराबाहेर गेलेले होते. बंद असलेल्या घरातून रात्री धूर येत असल्याने लक्षात आले. त्यानंतर अग्निशामक दलाला बोलावून आग विझवण्यात आले मात्र झोरे यांचे नुकसान झाले आहे