वरंधा घाटातील वाहतूक उद्यापासून पुन्हा होणार बंद

महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावीरल वरंधा घाट ते महाडदरम्यान रस्ता कामातील दुपदरीकरणासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आलेला घाट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १ मे पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र ९ मे पासून घाटातील वाहतुकीला पुन्हा ब्रेक लागणार आहे.या ठिकाणी आठवडाभर थांबवण्यात आलेले दुपदरीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासासाठी वरंधा घाटातील वाहतुकीचा ८ मे अंतिम दिवस आहे. ९ मे पासून घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवून दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button