रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदान पाहता आमचा विजय निश्चित -विनायक राऊत
रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान पाहता आपला विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. मतदारांनी सकारात्मक विचार करून मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. समोरच्या उमेदवाराने मतदारांना राजरोस पैशाचे वाटप केले. तरीही मतदारांनी उत्तम मतदान केल्याचेही ते म्हणाले,भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी ३ लाखांच्या मताधिक्याने आपण विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. आपण कोणत्याही परीक्षेला बसलो, तरीही अभ्यास करूनच बसतो. त्यामुळे पेपर सोपाच जातो. २००५ च्या पोटनिवडणुकीत स्व. बाळासाहेबांपासून सर्व नेतेमंडळी आली होती. पण काय झाले? डिपॉझीटही वाचविता आले नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यासमोर आव्हानाची भाषा करू नये, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. www.konkantoday.com