
माजी आमदार रामदास कदम यांनी तोंडातून घाण ओकली : आमदार भास्कर जाधव
शिंदे गटात गेलेले माजी आमदार रामदास कदम यांनी तोंडातून घाण ओकली अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली, तसेच रामदास कदम यांना महाराष्ट्रातील जनता जोड्याने मारेल असेही जाधव म्हणाले.रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, की काल रामदास कदम यांनी सभा घेतली, ही बैठक संपूर्ण राजकीय सामाजिक वैचारिक बैठकीला छेद देणारी होती. रामदास कदम यांनी वापरेली भाषा आधी कुणीच वापरली नव्हती, रामदास कदम यांनी जी भाषा वापरली हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल, तसतसे महाराष्ट्रातील जनता आणि विशेषतः महिला वर्ग रामदास कदम यांना जोड्याने मारतील. मुंबईत एक कोटी ३० लाख जनता राहते, आणि त्या जनतेकरिता शौचालयाची व्यवस्था आहे, या सगळ्या शौचालयाची जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांच्या तोडून बाहेर पडली असे जाधव म्हणाले. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी आक्षेपार्ह विधानं केली, ती विधानं मी या कॅमेर्यासमोर बोलूही शकत नाही, ज्या दिवशी रामदास कदम यांची ही विधानं महाराष्ट्रात जातील तेव्हा जनता त्यांना जोड्याने मारतील. मी कुणावरही कधीही वैयक्तिक टीका करत नाही, मी रत्नागिरी आणि दापोलीत जी विधानं केली त्यात मी कुठलीही वैयक्तिक टीका केली नाही. उदय सामंत काय म्हणाले, रामदास कदम काय म्हणाले यावर मी टीका केली असेही जाधव म्हणाले.
www.konkantoday.com