मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळ आंब्याच्या टेम्पोला अपघात चालक किरकोळ जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जाणार्या टेम्पोचा एक्सल तुटून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळ केभुर्ली येथे घडली. मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट मधून आंब्याच्या पेट्या खाली करून पुन्हा खेड तालुक्यात आंबा आणण्यासाठी एम एच ०८-५५८३ या क्रमांकाचा टेम्पो भरधाव वेगात जात असता मार्ग क्रमांक ६६ वरील महाड तालुक्यातील केभुर्ली गावाजवळ टेम्पोचा एक्सल तुटून टेम्पो पलटी झाला. www.konkantoday.com