प्राचीन कोकणने साकारले पर्यावरण रक्षण मतदान केंद्र सर्वांचे आकर्षण ठरले

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानाच्या वेळी गणपतीपुळे ता. रत्नागिरी येथील जि.प. आदर्श शाळेत निसर्ग रक्षण संदेश देणारे मतदान केंद्र आकर्षण ठरले. नव्या संकल्पनेचे अनेक मतदारांनी कौतुक केले.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच मतदान जेवढे महत्वाचे तेवढेच निसर्ग रक्षणही महत्वाचे आहे. ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी, असा विषय मांडला. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी पर्यावरण केंद्राच्या उभारणीसाठी रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या प्रसिद्ध प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांच्याकडे त्या संदर्भात देखावा तयार करण्याची विनंती केली.गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण हे म्युझियम हे गेली २० वर्षे निसर्ग रक्षणाचेच कार्य करत आहे. त्यासाठी मतदान केंद्र म्हणून निवडल्या गेलेल्या शाळेत कोकणचा समृद्ध निसर्ग दाखवणारा देखावा मतदारांसाठी तयार केला. कोकणात सर्वसाधारणपणे आढणणारे बिबटे, ब्लॅक पँथर, हरीण यांचा समावेश या दृश्यात करण्यात आला. समृद्ध जलाशय, त्या मागचे हिरवेगार जंगल व त्या जंगलासमोर विहारणारे जंगलातील विविध जंगली प्राणी हे या दृश्यामध्ये साकारले होते. तसेच एक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button