पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण सुरू
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात शेकडो वर्षे वयाचे धोकादायक पुरातन वृक्षांची रत्नागिरी नगर परिषदेकडून पाहणी केली जात आहे. जे धोकादायक वृक्ष खासगी मालकीच्या जागेत आहेत त्या जागा मालकांना योग्य दक्षता घेण्यास सांगितली जात आहे. त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेच्या जागेत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबत आवश्यकती दक्षता घेतली जात आहे.यंदा पावसाळा लवकर सुरू होवून तो समाधानकारक असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून खालच्या भागात परिघीय किंवा सभोवताली दाटीवाटीची वस्ती आहे. या भागामध्ये अनेक पुरातन किंवा शेकडो वर्ष जुने पिंपळ, वड, चिंच असे मोठ्या बुंध्यांचे आणि विस्तारलेले वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष पोखरलेले आणि पूर्णपणे सुकलेले आहेत. यातील धोकादायक वृक्षांची माहिती जमा केली जात आहे.www.konkantoday.com