पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची भाट्ये नारळ संशोधन केंद्राला भेट
अलिकडे सतत अभ्यासात मग्न राहणार्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीद्वारे विविध उपक्रमशील संस्थांमध्ये भेटी घडविल्या जातात. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी मंडळाने पटवर्धन हायस्कूलच्या पाचवी ते आठवीतील मुलांसाठी एक दिवसाचे नर्सरी लागवड प्रशिक्षण भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात आयोजित केले.या उपक्रमाला सदस्य विनायक हातखंबकर, दिलीप भाटकर, मुल्ला, संतोष कुष्टे यांनी सहकार्य केले. नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. दिलीप नागवेकर व नारळ संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील घवाळे, कीटकशास्त्र डॉ. संतोष वानखेडे आदींनी कलमबांधणी, झाप वळणे, दालचिनीच्या साली काढणे, काळमिरीची रोपे तयार करणे याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून कृती करून घेतली. www.konkantoday.com