
तिवरे धरण विमोचकाजवळील डोहात छोटा मुलगा बुडाला
तालुक्यातील फुटलेल्या तिवरे धरण विमोचकाजवळील डोहात कपडे धुण्यासाठी बहिणीबरोबर गेलेल्या ११ वर्षीय मुलगा पाय घसरून बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० च्या उघडकीस आली. रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते.वंश संतोष खरात (१०, तिवरे धनगरवाडी) असे बुडालेल्या बालकाचे नाव आहे. २ जुलै २०१९ रोजी तिवरे धरण फुटले. त्यानंतर या धरणाच्या विमोचकाजवळ डोह निर्माण झाला आहे. साधारण २० ते २५ फूट तो खोल असून सध्या त्यामध्ये गाळही साठला आहे.त्या ठिकाणी जनावरांना पाण्यासाठी तसेच कपडे धुवण्यासाठी ये-जा सुरू असते. असे असताना मंगळवारी वंश हा आपल्या बहिणीबरोबर कपडे धुण्यासाठी या डोहाजवळ गेला होता. या डोहापासून वंशचे वडीलही काही अंतरापासून दूर होते. यावेळी वंश हा पाय घसरून पाण्यात पडल्यानंतर तो गायब झाला. या बाबतची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर शोध घेण्यात आला. अलोरे- शिरगांव पोलीस स्थानकातही माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.www.konkantoday.com