खेड सायकलिंग क्लबचा सामाजिक उपक्रम, आंबयेतही कचरा संकलन
खेड सायकलिंग क्लबच्यावतीने तालुक्यातील आंबये ग्रामदेवता मंदिर परिसरात कचरा संकलन करण्यात आला. या मोहिमेत सायकलिंग क्लबच्या सदस्यांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी १० पोती प्लास्टिक कचरा जमा करत चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संघाकडे वर्गीकरण व प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.दोन दिवसापूर्वी सायकलिंग क्लबच्या वतीने मुरडे येथे राममंदिर व खेमनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत कचरा संकलन केला होता. यापाठोपाठच आंबये येथील ग्रामदेवता मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली. येथील ग्रामदेवता मंदराची वार्षिक जत्रा नुकतीच पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सायकलिंग क्लबने स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. परिसरातून १० पोती प्लास्टिक कचरा संकलन करत परिसर चकाचक केला.www.konkantoday.com