ऐन उन्हाळ्यात दापोली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
दापोली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकाजवळ उसी हॉटेलसमोर फुटल्याने शनिवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले परंतु ही पाईपलाईन रविवारी सकाी दुरूस्तही करण्यात आल्याचे दापोली नगरपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर कोकंबाआळी येथेही पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया गेल्याचे नागरिकांमधून समोर आले. पाणीटंचाईच्या काळात दोन ठिकाणी पाईपलाईन फुट्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दापोलीतही चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. www.konkantoday.com