
आमचे उमेदवार नारायण राणे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील -आमदार नीतेश राणे
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदारांचा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. आमचे उमेदवार नारायण राणे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील.विरोधकांचा पराभव झालाच आहे. त्यांनी तो मान्य केला आहे. मैदानात हरवू शकत नसल्याने ते आता वाटेल ते आरोप करत असल्याचे प्रतिप्रादन आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.www.konkantoday.com