
जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांचा आरोप
जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांनी केला आहे
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मासे मरून पडलेले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
जिंदाल कंपनीकडून होणाऱ्या प्रदुषणामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत.जिंदाल पोर्ट मध्ये गॅस गळतीनंतर प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला होता.जिंदाल पोर्टच्या अंबुवाडीतील गॅस टर्मिनललाही ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.अशावेळी आज नांदिवडेच्या समुद्रकिनाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळाला.समुद्र किनाऱ्यावर मासे मरून पडल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने खव्वय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदिवडे गावचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे आणि मच्छीमार रोहन सुर्वे यांनीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देत जिंदाल कंपनीने सोडलेल्या सांडपाण्यामुळे नांदिवडे किनाऱ्यावर मासे मरून पडले आहेत.तात्काळ हे प्रदुषित सांडपाणी बंद करावे आणि जिंदाल कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.




