
लोकसभा निवडणूक – 2024 प्रशासनाचे उत्तम प्रशिक्षण, सर्वोत्तम नियोजन मॉकपोल दरम्यान केवळ 0.82 टक्के इव्हीएम रिप्लेस
रत्नागिरी, दि. 7 : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी झालेल्या मॉकपोलमध्ये 0.82 टक्के बॅलेट युनिट, 0.36 टक्के सीयु आणि 0.77 टक्के व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. उत्तम प्रशिक्षण घेतल्यामुळे आणि सर्वोत्तम नियोजनामुळे मतदान प्रक्रीया सर्वत्र सुरळीत पार पडत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. आज सकाळी झालेल्या मॉकपोल दरम्यान एकूण 1942 मतदान केंद्रांवर 265 चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये एक बीयु, 4 व्हीव्हीपॅट, 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 5 बीयु, 1 सीयु आणि 2 व्हीव्हीपॅट , 267 राजापूर विधानसभा मतदार संघात 1 बीयु, 1 सीयु आणि 2 व्हीव्हीपॅट, 268 कणकवलीमध्ये 1 बीयु, 1 व्हीव्हीपॅट, 269 कुडाळमध्ये 6 बीयु, 4 सीयु आणि 4 व्हीव्हीपॅट आणि 270 सावंतवाडी 2 बीयु, 1 सीयु, 1 व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. हे प्रमाण एकूण मतदान केंद्राच्या केवळ 0.82 टक्के बॅलेट युनिट, 0.36 टक्के सीयु आणि 0.77 टक्के म्हाणजेच १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मॉकपोलनंतर सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. www.konkantoday.com