राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन यांचे मार्फत क्षयरुग्णांना मोफत औषधांचे वाटप

  • फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, जलसंधारण आणि स्वच्छता यासारख्या विविध क्षेत्रात काम करत आहेत. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमानुसार फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात मध्ये आज पर्यंत ११०० गरीब व गरजू क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार देऊन निक्षय मित्र’ बनून आरोग्य क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.आणि लवकरच राजस्थानमध्ये हि येणाऱ्या काळात टीबी पेशंट ला मदत सुरु करेल. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी निक्षय मित्र अंतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी एक पाऊल पुढे टाकत आणि रत्नागिरी व पुणे येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या तात्काळ आवाहनाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशने ९४८ टीबी रुग्णांना अँटी-कोच औषधे दान केली. राज्यामध्ये क्षयरोगाच्या औषधांचा कमी पुरवठा होत असल्याने क्षयरुग्णांना नियमित औषधोपचार मिळण्यासाठी फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशन यांचे कडे मागणी करण्यात आली. त्यानंतर लगेचच जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांना 1 महिना पुरेल एवढा औषध साठा पुरविण्यात आला आहे. त्याची सुरवात दिनांक ३ मे २०२४ पासून करण्यात आली. सदर कार्यक्रमा वेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये सर, मा.वैद्यकीय अधिकारी डॉ विटेकर सर, मा. टेक्निकल डायरेक्टर फिनोलेक्स श्री सोमय्या चक्रवर्ती, मा.फॅक्टरी मॅनेजर श्री सागर चिवटे, मा. वैद्यकीय अधिकारी फिनोलेक्स डॉ.अनुप करमरकर तसेच जनसंपर्क अधिकारी श्री अभिषेक साळवी इत्यादी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. जगताप, डॉ. आठल्ये आणि डॉ. गावडे यांनी या देणगीबद्दल फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेश आभार मानले आणि जोडले की अशा प्रकारच्या देणगीमुळे क्षयरोगाचा सामना करण्यास मदत होईल ज्यामुळे लवकर बरे होण्यास आणि क्षयरुग्णांची कार्यक्षमता पुनर्संचयित करण्यात मदत होईल. ही मदत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या यशातील एक मैलाचा दगड ठरेल. या उदार देणगीबद्दल डॉ. जगताप, डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि डॉ. गावडे यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button