
निवसर येथील घटना विहिरीतील विषारी वायुमुळे
लांजा ः वर्षभर पत्र्याचे झाकण घालून बंद केलेल्या विहिरीत साचलेल्या विषारी वायुमुळे तीन कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. फिनोलेक्स कंपनीच्या आपत्कालीन पथकाने मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तिन्ही कामगारांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले.
निवसर वरची मळवाडीत विजय श्रीपाद सागवेकर यांच्या मालकीची विहिर आहे. सोन्याचे व्यापारी असलेल्या श्री. सागवेकर यांना रविवारी सुट्टी असल्याने त्यांनी विहिर साफ करण्यासाठी तीन कामगारांना बोलावले होते. स्वतः विजय सागवेकर, सहकारी नंदकुमार सागवेकर, अनिल सागवेकर हे विहीर उपसण्यासाठी खाली उतरले. त्यापूर्वीच विहिरीत मोठ्या प्रमाणात विषारी वायू साचल्याने तिघेजण बेशुद्ध पडले. त्यांना वाचविण्यासाठी कोणतीही संधी न मिळाल्याने तिघांचा विहिरीतच दुर्दैवी अंत झाला.