रत्नागिरी शहरात सीएनजीची टंचाई, पंपावर लागल्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी शहरात एसटी कॉलनी माळनाका येथे मध्यवर्ती भागात असलेल्या एकमेव सीएनजी पंपावर सीएनजी वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून याठिकाणी सीएनजी भरण्यासाठी चारचाकी गाड्यांसह रिक्षांच्याही लांबच लांब रांगाा लागताना दिसून येत आहेत.अलिकडे रत्नागिरीत वाहनांमध्ये सीएनजीचा वापर वाढलेला आहे. रिक्षाबरोबरच अनेक कारगाड्यांही सीएनजीवर चालत आहेत. त्यामुळे या वाहनधारकांची असलेली मागणी आणि पुरवठा यांचे व्यस्त गणित असल्याने सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा लागत आहेत. सध्या अनेक ग्राहक आदल्या दिवशी पंपाच्या बाहेर आणि रस्त्याच्या कडेला नंबर लावताना दिसून येत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे सीएनजी वापरणार्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू आहे. मंगळवारी मतदान असल्याने मतदारांना मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर होणार आहे. तसेच बाहेरून येणार्या पर्यटकांच्या वाहनांची संख्याही वाढलेली आहे. त्याचा ताण उपलब्ध असलेल्या सीएनजी पंपावर दिसून येत आहे. www.konkantoday.com