रत्नागिरी येथील कलाकार विजय डाफळे यांचे दुःखद निधन

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि रत्नागिरीतील कलाकार श्री विजय डाफळे यांचे अल्पशा आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले.डाफळे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला होते परंतु त्यांचा ओढा हा कलाक्षेत्राकडे होता. रत्नागिरी मध्ये आर्केस्ट्रा सुरू करणे त्यामध्ये विविध प्रयोग करणे यासारख्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. अक्षत या सांस्कृतिक संस्थेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीचा कार्यक्रम ते नियमितपणे आपल्या निवासस्थानी स्थानिक कलाकारांना बोलवून साजरा करत असत. डाफळे हे व्यायाम पटू देखील होते यामुळे शरीर संस्था क्षेत्रांमध्ये त्यांना मोठा सन्मान होता.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संघटनेचे काम देखील ते पाहत असत. त्यांचा मित्र परिवार सर्व क्षेत्रात होता.विजय डाफळे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button