रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाने मतदानाला सुरुवात ,अनेक ठिकाणी रांगा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून नागरिकांनी सकाळी मतदानासाठी उत्साह दाखवला आहे काही मतदार केंद्रावर मतदारानी रांगा लावल्या होत्या जिल्हा प्रशासनाचे प्रमुखनिवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांनी आज सकाळीच मतदान करून नागरिकांनी मतदान करावे यासाठी आवाहन केले आहे अनेक मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली असून सध्या असलेल्या उन्हाळ्यामुळे मतदारांना त्रास होऊ नये म्हणून काही ठिकाणी मंडपही करण्यात आले आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
www.konkantoday.com