बाबा तूच वस्तरा घे आणि काढ, अजितदादाचा श्रीनिवास पवार यांना टोला
राज्यात 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अलीकडेच केले होते. या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.बाबा तूच वस्तरा घे आणि काढ, असा टोला अजितदादांनी श्रीनिवास पवार यांना लगावला. बारामतीमधील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी मनमोकळेपणाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार गटाच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले.श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्यासोबत आहे. आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. www.konkantoday.com