
प्रस्ताव पाठवूनही दीड महिन्यानंतरही प्रशासनाला दाखलाच प्राप्त नाही
खेड तालुक्यातील पाणी टंचाई उग्र रूप धारण करू लागली आहे. उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत तळ गाठत असल्याने टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेणार्या ग्रामस्थांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खोपी येथील अवकिरेवाडी, मानेवाडीतील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी येथील प्रशासनाकडे पहिला अर्ज दाखल केला होता. मात्र दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप प्रशासनाला दाखलाच प्राप्त झालेला नाही. याचमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली असून ग्रामस्थ पाण्यासाठी अक्षरशः आक्रोश करत आहेत.तालुक्यात ८ गावातील २६ वाड्यांमध्ये एक शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय आणखी ९ गावे १४ वाड्यांनी टँकरसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. www.konkantoday.com